कोहली, पड्डीकलमुळे बंगळुरुचा विजय   

बंगळुरु : आयपीएल 2025 च्या 42 व्या सामन्यात गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्तान रॉयल्स आमनेसामने होते. चिन्नास्वामी मैदानावर खेळल्या जाणार्‍या या सामन्यात राजस्तान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बंगळुरुने 20 षटकांत 205 धावा केल्या. त्यामुळे राजस्तानच्या संघाला 206 धावांचे आव्हान मिळाले. मात्र राजस्तानचा संघ हे आव्हान पार करू शकला नाही. त्यामुळे हा सामना 11 धावांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने जिंकला. 
 
या वेळी बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने 42 चेंडूत 70 धावा केल्या. आणि अर्धशतक साकारले. यावेळी त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. कोहली याला जोफ्रा आर्चर याने शानदार गोलंदाजी करत नितीश राणाकडे झेलबाद केले. त्याआधी सलामीवीर फिल सॉल्ट हा 26 धावा करून बाद झाला. वानिंदू हसरंगा याने हॅटमायरकडे त्याला झेलबाद केले. देवदत्त पडीक्कल याने 50 धावा केल्या. त्याने बंगळुरुच्या संघासाठी दुसरे अर्धशतक केले. पड्डीकल याला संदीप शर्माने चकविणारा चेंडू टाकत नितीश राणाकडे झेलबाद केले. 
 
टिम डेविड याने 23 धावा केल्या. मात्र तो धाव घेताना बाद झाला. रजत पाटीदार हा अवघ्या 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर संदीप शर्मा याने शानदार गोलंदाजी करत ध्रुव ज्युरेल याच्याकडे झेलबाद केले. त्यानंतर जितेश शर्मा हा 20 धावांवर नाबाद राहिला. तर 15 अवांतर धावा बंगळुरुला मिळाल्या.
त्यानंतर 206 धावांचे आव्हान पुर्ण करण्यसाठी मैदानावर आलेल्या. राजस्तानच्या संघाने 20 षटकांत 194 धावा केल्या. यावेळी सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने 19 चेंडूत 49 धावा केल्या. त्याचे अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकले. त्यानंतर वैभव सुर्यवंशी याने 16 धावा केल्या. भुवनेश्‍वरकुमार याने त्याचा त्रिफळा उडविला. नितीश राणा याने 28 धावा केल्या. कृणाल पांड्या याने नीतीश राणा याला भुवनेश्‍वरकुमार याच्याकडे झेलबाद केले. रियान पराग याने 22 धावा केल्या. कृणाल पांड्या याने त्याला जितेश शर्माकडे झेलबाद केले. ध्रुव ज्युरेल याने 47 धावा केल्या. जोश हेझलवूड याने शानदार गोलंदाजी करत जितेश शर्मा याला झेलबाद केले. शुभम दुबे याने 12 धावा केल्या. यश दयाल याने शानदार गोलंदाजी करत फिल सॉल्ट याच्याकडे झेलबाद केले. आर्चर  भोपळा न फोडता बाद झाला. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
बंगळुरु : कोहली 70, फिल सॉल्ट 26, पड्डीकल 50, टिम डविड 23, रजत पाटीदार 1, जितेश शर्मा नाबाद 20, अवांतर 15 एकूण 20 षटकांत 205/5
राजस्तान रॉयल्स : जैस्वाल 49, वैभव सुर्यवंशी 16, नितीश राणा 28, रियान पराग 22, ध्रुव ज्युरेल 47, शिमरॉन हॅटमायर 11, शुबम दुबे 12, आर्चर 0, वानिंदू हसरंगा 1, तुषार देशपांडे नाबाद 1, फारुकी 2 एकूण : 20 षटकांत 194/9
 

Related Articles